पार्किंगच्या नावाखाली खंडणी वसूल केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह दोघांन विरोधात गुन्हा दाखल

अधिकृत पार्किंग नसतानाही खोटे पावती पुस्तक छापून पार्किंगच्या नावाखाली हजारो रुपये वसूल केल्याप्रकरणी बंडु आण्णा आंदेकर याच्यासह दोघांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बंडु आण्णा आंदेकर (रा. नाना पेठ, पुणे) आणि सागर थोपटे (नाना पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गौरव सिद्धू सारवाड (वय 24, राहणार संभाजीनगर धनकवडी) … Read more

कोरोनाचा बाऊ करुन मालक वर्गाने कामगाराचें शोषण करु नये – डॉ. रघुनाथ कुचिक

कोरोनाच्या आडून उद्योजकांनी मानवी हक्कांचे उल्लंघन करू नये, तसेच कामगारांची पिळवणूक करून त्यांच्या आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी दिला. पिरंगुट येथील रोची इंजिनियर्स मधील भारतीय कामगार सेनेच्या नवीन युनिट नामफलक उद्घाटन डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुकाराम केमसे, … Read more

गंज पेठेत गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यू

पुण्याच्या गंज पेठ परिसरात गुरुवारी रात्री भंगार गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत गोडाऊनमध्ये झोपलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. शिवकांत कुमार (वय 28, रा. मूळ. उत्तरप्रदेश, सध्या, मासेआळी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गंज पेठ परिसरात आर के स्क्रॅप सेंटर हे भंगार मालाचे … Read more

एक एप्रिल पासून पुणेकरांना भरावा लागणार वाढीव मिळकत कर !

मिळकत करातील वाढ सर्वसाधारण सभेने फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता कराची आकारणी करण्यासाठी निश्‍चित केलेल्या वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे एप्रिलनंतर नव्याने कर आकारणी होणाऱ्या सदनिकांच्या मिळकतकरात वाढ होणार आहे. महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात ११ टक्क्यांची वाढ प्रस्तावित केली होती. … Read more

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण जाहीर

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना गुरुवारी महाराष्ट्राचा सर्वेच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. सन 2020च्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आशाताईंना गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आशा भोसले हे नाव जुन्या पिढीपासून सध्याच्या तरुण पिढीपर्यंत प्रत्येकाला माहीत आहे. चिरतरुण, चतुरस्र पार्श्वगायिका म्हणून त्यांची … Read more

कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 8 रुग्णांची नोंद; 90 सक्रिय रुग्ण, 8 जणांना डिस्चार्ज

छावणी हद्दीत आज 8 रूग्णांची नोंद झाली; 90 सक्रिय रूग्ण, 8 डिस्चार्ज The post Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 8 रुग्णांची नोंद; 90 सक्रिय रुग्ण, 8 जणांना डिस्चार्ज appeared first on MPCNEWS.

जल्लोष भोवला, उपमहापौरांच्या मुलासह 70 जणांवर गुन्हा

उपमहापौरपदी निवड झाल्यानंतरचा जल्लोष साजरा करणे उपमहापौर हिराबाई घुले यांच्या चिरंजीवाला चांगलाच भोवला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौर घुले यांच्या चिरंजीवासह 60 ते 70 जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल केलेल्या उपमहापौरांच्या मुलाचे नाव आहे. ते … Read more

शहरात होळी, धुलीवंदन साजरी करण्यास मनाई : आयुक्तांचा आदेश

कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा अगर रस्त्यावर होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्याचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत वैयक्तीकरित्या सुद्धा हा सण साजरा करणे टाळावे, असे आवाहनही आयुक्त … Read more

‘घराची नोंद करायचीयं, खासगी ठेकेदाराकडे जा’

‘घर नोंदणी करू इच्छितो, खासगी कंत्राटदाराकडे जा’ : ‘घराची नोंद करायचीयं, खासगी ठेकेदाराकडे जा’ appeared first on